असतो एक कट्टा..
सुट्टी लागताच कोलेजला
पडतो बिचारा एकटा..
वावरत असते तरुणाई
होऊन तिथे दंग..
अनेक रंग मिसळुन मिळतो
कट्ट्याला त्याचा रंग..

चहा दोघात मारायचा असतो,
सिगरेट चौघात फ़ुंकायची असते..
अभ्यासाच्या विषयाला मात्र
इथे नेहेमीच बंदी असते..

सिगरेटचा ब्रॅन्ड असतो,
प्रत्येकाचा आपला आपला
हिरवळीचा विषय मात्र
सगळ्यांच्या जीव्हाळ्याचा..

प्रोफ़ेसर चा उल्लेख”तो”ने करायचा
इथे असतो नियम..
कित्येक पिढ्या आल्या गेल्या
कट्टा मात्र कायम..

वेगळी भाषा असते इथली
वेगळे असतात कायदे..
सिनीअर्स बरोबर चकाट्या पिटायचे
असतात इथे फ़ायदे..

नापास होऊन यायला इथे
नसते कधी बंदी..
दर वर्षी येतात इथे
नवे नवे पंछी..

निवांत बसावे इथे मित्रांशी बोलत..
बिंधास्त बसावे इथे फ़ुलपाखरे मोजत..

नसतो कट्टा साधसुधा,
असते एक कॉलेज..
कट्ट्याशिवाय कॉलेज आम्ही
मानत नाही कॉलेज..

प्रत्येक कॉलेजबाहेर
असतो एक कट्टा..
सुट्टी लागताच कोलेजला
पडतो बिचारा एकटा..

वावरत असते तरुणाई
होऊन तिथे दंग..
अनेक रंग मिसळुन मिळतो
कट्ट्याला त्याचा रंग..

चहा दोघात मारायचा असतो,
सिगरेट चौघात फ़ुंकायची असते..
अभ्यासाच्या विषयाला मात्र
इथे नेहेमीच बंदी असते..

सिगरेटचा ब्रॅन्ड असतो,
प्रत्येकाचा आपला आपला
हिरवळीचा विषय मात्र
सगळ्यांच्या जीव्हाळ्याचा..

प्रोफ़ेसर चा उल्लेख"तो"ने करायचा
इथे असतो नियम..
कित्येक पिढ्या आल्या गेल्या
कट्टा मात्र कायम..

वेगळी भाषा असते इथली
वेगळे असतात कायदे..
सिनीअर्स बरोबर चकाट्या पिटायचे
असतात इथे फ़ायदे..

नापास होऊन यायला इथे
नसते कधी बंदी..
दर वर्षी येतात इथे
नवे नवे पंछी..

निवांत बसावे इथे मित्रांशी बोलत..
बिंधास्त बसावे इथे फ़ुलपाखरे मोजत..

नसतो कट्टा साधसुधा,
असते एक कॉलेज..
कट्ट्याशिवाय कॉलेज आम्ही
मानत नाही कॉलेज..